मालेगाव – आदर्श विद्यालय, मालेगाव येथे आठवीत शिक्षण घेत असलेला तन्मय सुनील शेलार याने जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्याने ९७ टक्के गुण मिळवून शहरी भागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तन्मयच्या या यशामध्ये आदर्श विद्यालयाचे प्राचार्य मिश्रा, वर्गशिक्षक तसेच इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तन्मय हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार नगर वडेल येथील प्राथमिक शिक्षक श्री. सुनील व माधुरी शेलार यांचा चिरंजीव आहे.
शिवकृपा कॉलनीत राहणाऱ्या तन्मयच्या कुटुंबाचे आणि त्याच्या यशाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. तन्मयचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.