के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगांव कॅम्प येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सामाजिक कार्यकर्त्या मा. सुचेता सोनवणे यांचे व्याख्यानाचे आयोजन करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम होते.यावेळी प्रमुख अतिथी तथा व्याख्यात्या मा. सुचिता सोनवणे (सामाजिक कार्याबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त ),संगीता परदेशी (आंतरराष्ट्रीय इनव्हील क्लब ऑफ मालेगाव प्रेसिडेंट), अमृता कुंभकर्ण (संगीत विशारद गायन ),अरुणा पाटील ( समाजसेविका) ,चारुशीला निकम( लोकनियुक्त माजी सरपंच), वैशाली शेलार (अल्ट्रासायकलिस्ट), उपप्राचार्य नितीन गवळी ,उपप्राचार्य विश्वास पगार, पर्यवेक्षक मधुकर आहेर, पर्यवेक्षक केशव देवरे विराजमान होते.व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रास्ताविक व व्याख्याते यांचा परिचय विशाखा समितीच्या प्रा.पद्मावती कानडे यांनी केला. व्याख्यात्या सामाजिक कार्यकर्त्या मा. सुचेता सोनवणे यांनी महिलांचे विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलतांना आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून आपल्या कर्तुत्वाने त्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे हे सांगून उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जागतिक महिला दिन निमित्ताने विद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामकाज करणाऱ्या महिलांचासन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांनी मिळवलेल्या यशाचा अतुलनीय आढावा घेत महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन करून जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन श्रीमती जे.एस. देवरे यांनी केले.आभार ए.पी.भामरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग , विशाखा समिती,महिला तक्रार निवारण समिती यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यार्थी ,विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक ,शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.