आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत उपशिक्षिका श्रीमती पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय रेणुका (आजी) भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करुन त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आजींचे फ़ार मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांनी आपले जीवन व कुटुंब सामाजिक व शैक्षणिक कार्यात वाहुन घेतले होते. कौटुबिक संस्काराचा वारसा आजींनी पुढे चालविला व समाजासमोर एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणुन त्यांचा नांवलौकीक होता असे विचार व्यक्त केले.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.एस. लहारे यांनी आपल्या मनोगतातुन स्व. रेणुकाआजी हिरे यांचा जीवनपट उलगडत असतांना अगदी प्रारंभीच्या काळापासुन तर शेवटपर्यंत आजींच्या कार्याचा आढावा घेतला यात हिरे घराण्याच्या नावलौकीकासाठी आजींचे मौलीक योगदान आहे असे लहारे यांनी स्पष्ट केले. यावेळी श्री. प्रधान डौरे, श्री. वाल्मीक हलवर यांनी आपली मनोगते व्यक्त करीत आजींच्या कार्याचा परिचय करुन दिला.
कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. रत्नाकर गावित, उपशिक्षक श्री. योगेश्वर खैरनार, श्री. गणेश महाले, श्री. संदिपसिंग पवार, श्री. निवृत्ती पवार, श्री. भुपेंद्रसिंग पाटील, श्री. मनोहर डोंगरेज यांच्यासह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंत्रसंचलन श्री. समाधान पवार यांनी केले.