प्रतिनिधी | देवळा: गणेश आढाव
देवपुरपाडे: ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे या विद्यालयाचा दहावीची (एसएससी) परीक्षा मार्च 2024 मध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये 9 विद्यार्थी प्रावीण्य वर्गात तर 8 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील गुणानुक्रमे पहिले पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
1. अहिरे योगिता समाधान - 457+7 = 464 (92.80%)
2. अहिरे दिक्षा कैलास - 456+3 = 459 (91.80%)
3. ठाकरे ॠतुजा गोकुळ - 437+3 = 440 (88.00%)
4. साळुंके यज्ञेश जगदिश - 432+3 = 435 (87%)
5. बच्छाव यश प्रकाश - 425+3 = 428 (85.60%)
संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू अहिरे, विश्वस्त मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशस्वीतेमुळे विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल आणि पालकांच्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.