📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

निमगाव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

मालेगाव , 2 मार्च 2024: निमगाव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगाव येथे आज प्रथमच माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. 2015 ते 2023 या कालावधीतील विविध बॅचचे माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री राजेंद्रकुमार जयकुमार कासलीवाल उपस्थित होते.

मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणीक प्रवासात मिळालेल्या शिक्षण व अनुभवांचा तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांच्या आयुष्यात कशाप्रकारे झाला याबद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश पाटील यांच्यासह इतर शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मेळावा संपल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत फोटो काढून आठवणींना उजाळा दिला.

या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा स्नेहबंध निर्माण झाले आणि त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने