📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस.चौकलिंगम

मुंबई:(रुपेश जगताप) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोठे बदल करण्यात आले आहेत. एस.एम. देशपांडे यांच्या जागी वरिष्ठ सनदी अधिकारी एस.चौकलिंगम यांची आज नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

चौकलिंगम सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असल्यामुळे देशभरात राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठे बदल होत आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात येत आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी चौकलिंगम यांची नियुक्ती करून लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने