रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून माविद्यालयात साडी डे व फॅन्सी ड्रेस डे उत्साहात साजरा करण्यात आले. यामध्ये रावळगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यातील वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी मनमोहक वेशभूषा करून विविधतेत एकतेची परंपरा जपत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. सदर उपक्रमामध्ये चेतन पगार, भाग्यश्री माळेकर, सुशील पवार, तुषार भामरे, अजय गुंजाळ अजय, गणेश देवरे, गणेश पगार, दिपाली नवरे, ऋतिका भामरे, दुर्गेश्वरी भामरे, पंकज मोरे या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी वेशभूषा परिधान केले होते. यावेळी सदर उपक्रमाच्या परीक्षक म्हणून प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. मोहिनी निकम, प्रा. अदिती काळे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. रुचा देवरे, यांनी काम पाहिले. यासाठी विद्यार्थ्यांना संयोजक प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. शरद आंबेकर, प्रा. भरत आहेर, प्रा.निलेश महाजन, प्रा. नितीन शेवाळे, प्रा. निलेश देवरे, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विविधतेत एकतेची परंपरा जपत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादाजी वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र गोसावी, उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, कार्यालयीन अधीक्षक दिपक पवार, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. त्रिमूर्ती सोमवंशी, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विष्णू बोरसे यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सदर मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.