( मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभाग तर्फे जागतिक मराठी भाषा दिवस गौरव दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने इंग्रजी विभागातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. मराठी भाषा शिकणे का आवश्यक आहे याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. निबंध स्पर्धेचे आयोजन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. अन्सारी हारून, डॉ सलमा अब्दुल सत्तार, प्रा. मुनव्वर अहमद आणि प्रा. मेश्रामकर सुनेत्रा यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. या प्रसंगी अनेक विद्यार्थीनी उपस्थित होत्या.