कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे विज्ञान प्रदर्शन भरवून साजरा केला राष्ट्रीय विज्ञान दिन
मानवी भवितव्यासाठी विज्ञान तंत्रज्ञांचा वापर होणे गरजेचे - डॉ.टी.एस. सावळे
रावळगाव प्रतिनिधी- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक येथे. येथे आज दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरवून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौदाणे ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुरेश दादाजी वाघ हे, तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव कॅम्प या महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा रसायनशास्र विभाग प्रमुख डॉ. टी. एस. सावळे हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. गोसावी हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. गोसावी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जिंकल विरमगामा यांनी तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विज्ञान शाखा प्रमुख प्रा. अदिती काळे यांनी केले, त्यात त्यांनी विज्ञान दिनाच्या आयोजनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा. मोहिनी निकम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रांजल पवार यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. टी. एस. सावळे म्हणाले की, सत्याचा शोध घेणे म्हणजे विज्ञान असून, औद्योगिक क्रांती नंतर मानवाने आपल्या सुख-सोयीसाठी विज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे, मानवी समुदायावर याचे अनेक अनुकूल व प्रतिकूल असे परिणाम झालेले आहेत. विज्ञानाचा वापर वर्तमानात मानवी कल्याणासाठी झाला तरच मानवी भवितव्य सुरक्षित राहील, त्यासाठी मानव जातीचे कल्याण करणाऱ्या संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात महान संस्कृती असून, अनेक शोध हे भारतीयांनी लावलेले आहेत, याचे तर या संबंधीचे अनेक दाखले भारतीय वेद परंपरेत मिळतात, आजच्या तरुणांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे येवून स्वत:चे भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. गोसावी म्हणाले की, विज्ञानाच्या प्रगतीने मानवाने अनेक यशाची शिखरे सर केली आहेत, यात अनेक भारतीय संशोधकांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांच्या या संशोधनाचा आजच्या विद्यार्थ्यांनी आदर्श घेवून आपले संशोधन केले तर देश निश्चितच विश्वगुरु होईल. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. गोसावी यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात रांगोळी, व विज्ञान प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली त्यात रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम भाग्यश्री जाधव, द्वितीय काथेपुरी चेतना, तृतीय देवरे तनुजा तर उत्तेजनार्थ शेवाळे दुर्गेश्वरी तसेच विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत अनुक्रमे प्रथम कापडे पियुष, द्वितीय भाग्यश्री माळेकर, तृतीय प्रवीण कापडणीस तर उत्तेजनार्थ आशुतोष पवार हे विद्यार्थी विजेते ठरले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रा.शरद आंबेकर, प्रा.अंबादास पाचंगे, प्रा. भरत आहेर, प्रा. निलेश महाजन, प्रा. नितीन शेवाळे, प्रा. निलेश देवरे, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. प्रियंका भामरे, प्रा. नेहा गांगुर्डे, प्रा. रुची देवरे, प्रा. प्रचीती देवरे, यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.