नाशिक ब्युरो टिम (मालेगाव लाईव्ह न्युज नेटवर्क):
नाशिकमधील सिडको परिसरातील २१ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. ७) उघडकीस आली. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. प्रथमेश प्रकाश बोरसे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सिम्बॉयसिस कॉलेजजवळील निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरात प्रथमेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
ऐन दिवाळीत आत्महत्या केल्याने परीसरात हळहळ