एक करंजी लाख मोलाची..आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था भायगाव इथं रविराज दादा बच्छाव, सत्यदर्शी सोशल फॉउंडेशन, शिवशंभु संघटना यांच्या तर्फे बेघर, गरजू, गरीब, बेसारा मुलांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद निर्माण केला ह्या वर्षी दिवाळी ह्या मुलांची गोड केल्याचा आनंद मिळाला असे वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेस कार्यरत रविराज बच्छाव (खाकी वर्दीतील समाजसेवक ) ह्यांनी अनुभला त्यांच्या सोबत दिनेश पगारे (तालुकाध्यक्ष शिवशंभु संघटना) सचिन पगारे, राकेश बच्छाव, अमोल जगताप, अमोल भाई जगताप आदी उपस्थित होते संस्थचे सचिव शामकांत पाटिल सर यांनी रविराज दादा बच्छाव मित्र परिवार यांचे आभार मानले कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते.