महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह अर्थात MTS च्या तंत्र दीपोत्सव २०२१ या डिजिटल दिवाळी अंकांचा प्रकाशन सोहळा Online पद्धतीने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. तंत्र दीपोत्सव दिवाळी अंक २०२१ चे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू मा. डॉ.ई.वायुनन्दन यांच्या शुभहस्ते Online पद्धतीने करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे डॉ.राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. तंत्र दीपोत्सव २०२१ च्या फ्लिपबुक चे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते Online करण्यात केले. या कार्यक्रमासाठी Zoom app तसेच Youtube Live द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनीं Online उपस्थित होते. तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.ई.वायुनन्दन कुलगुरू यांनी तंत्रस्नेही शिक्षक हे भविष्यातील समाज घडविण्याचे काम करत आहेत.कोरोना सारख्या महामारीच्या काळात तंत्रस्नेही शिक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे होते यावर प्रकाश टाकला.आमचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करते आणि MTS समुह हा इयत्ता पहिली पासुनच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षित करतो याबाबत समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तंत्र दीपोत्सव २०२१ हा तंत्रज्ञानाची शिक्षणाशी गुंफण घालणारा असून त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी डॉ.राजेश क्षीरसागर यांनी तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे आणि याचा अनुभव सर्व जगाने घेतला आहे आशा कठीण समयी तंत्रस्नेही शिक्षकांची भुमिका स्पष्ट केली.तंत्र दिपोत्सव २०२१ हा दिवाळी अंक खुप आकर्षक वाचनीय आणि तंत्रज्ञान युक्त असुन वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी सदिच्छा व्यक्त केली. या दिवाळी अंकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मा.ना.श्री.बच्चूभाऊ कडू राज्य मंत्री , शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी तंत्र दीपोत्सव २०२१ ला शुभेच्छा दिल्या आहेत.नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी मा.एम.व्ही.कदम तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख , तसेच विविध जिल्ह्यांतील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.या कार्यक्रमासाठी जितेंद्र गवळी प्रसिद्धी प्रमुख तसेच कल्पना सुपेकर अहमदनगर या उपस्थित होत्या. तंत्र दीपोत्सव २०२१ चे संपादकीय काम समुहाच्या राज्य समन्वयिका शारदा चौधरी, भिवंडी,सदाशिव अत्तारकर बुलढाणा, सुनील बडगुजर जळगाव , भालचंद्र भोळे भिवंडी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राज्य समन्वयक शारदा चौधरी व विशाल पाटील यांनी केले . कार्यक्रम प्रस्ताविक सुनिलभाऊ बडगुजर आणि शभालचंद्र भोळे यांनी केले. तसेच तांत्रिक मदत दत्ताभाऊ लोकरे आणि अमृतसिंग राजपूत यांनी केले.तांत्रीक सहाय्यक म्हणुन शाम गिरी यांनी मोलाचे योगदान दिले.आभार प्रदर्शन कल्पना शाह यांनी केले तर इशस्तवन व स्वागतगीत माधुरी पाटील यांनी सुमधुर आवाजात सादर केले. पाहुण्यांचे स्वागत MTS समूहाचे राज्यसमन्वयक संजयजी राठोड , सुनिल बडगुजर , दत्ता लोकरे , भालचंद्र भोळे ,शारदा चौधरी , नरहरी निकाडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय समाधान अहिरे मालेगाव व दत्ता लोकरे यांनी करुन दिला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाचे राज्यसमन्वयक भालचंद्र भोळे , समाधान अहिरे, सुनीलभाऊ बडगुजर , संजयजी राठोड, सुनीलजी हटवार , महेश पराड ,दत्ता लोकरे , सदाशिव अत्तरकार , वैशाली सावंत ,विशाल पाटील , शारदा चौधरी, किरण हिवराळे,सचिन महाडकर ,दिपक कोळी, राणा चौधरी, मंगला अळसपुरे, कल्पना शहा, सुधीर फडके , अमृतसिंग राजपूत,नरहरी निकाडे ,माधवी नेरकर,प्रभाकर गढरी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. तसेच या कार्यक्रमासाठी समुहाचे सर्व प्रशासक यामध्ये आदित्य धस,सचिन कोंकणे, बाळासाहेब बारवेकर,भाग्यश्री बदडे,प्रसाद नांगरे,विजयसिंग शिंदे,योगेश जाधव ,गजानन खरबडे,सुधाकर आडे,किशोर शिरसाठ , राजेंद्र शिंदे , मुरलीधर नानकर, नितीन डोळसे,सुनीता लहाने, गायत्री नेमाडे, माधुरी पाटील , सुजाता पगार ,प्रिया जोशी, सारिका आचमे, कुमुद नेहेते, वर्षा तांदळे-जायभाये, गोवर्धन शिंदे , उमेश राठोड,किशोर बुरघाटे, वीरभद्र मिरेवाड , अविनाश पाटील, ललित खरड , मनीषा डोके , सचिन दहिफळे , नरेंद्र राठोड , श्रीकृष्ण निहाळ , सतीश दुवावार , बशीर कुमठेकर , गिरीश सुर्यवंशी , प्रिया निक्रड,सोनाली देशमुख, नागनाथ बाचेवाड, अशोक लांडगे,राजेंद्र शिंदे,नितीन हरेल, मानसी कोळंबकर आदी सदस्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
(कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक)
(शिक्षण उपसंचालक अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे)
Tags
ycm