राकेश आहेर | चांदवड देवळा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना "दिवाळीचा पहिला दीवा रयतेच्या राजासाठी" या संकल्पनेतुन देवळा शहरातील दिवाळीचा पहिला दीवा शिवस्मारकावर लावण्यात आला.
ज्यांच्यामुळे देवळात देव आहेत अशा शिवछत्रपतींना मानाचा पहिला दीवा लाऊन दिपावली सणाची सुरवात करण्यात आली. यावेळी देवळा येथील शिवसृष्टीवर सायंकाळी ७ वाजता मानाचे पाच दीवे नाशिक जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदानाना आहेर, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष उदय आहेर, महारोजगार केंद्राचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार, गटनेते जितेंद्र आहेर यांच्या हस्ते लावल्यानंतर तीन हजार दिव्यांचे शिवभक्तांनकडुन एकाच वेळी दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शिवसृष्टीचा परिसर दिव्यांच्या उजेडाने प्रकाशमय झाला होता. त्यानंतर शिवरायांची आरती करण्यात आली. शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी तरुणांसमोर शिवरायांची विचारसरणी मांडली.
दिपोत्सवासाठी विशेष परिश्रम देवळा येथील तरुणांचे प्रेरणास्थान संभाजी आहेर, नानु आहेर व तुषार निकम या सर्वांच्या मित्रमंडळाने घेतले.
यावेळी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यातील मान्यवर व शिवभक्त असंख्य संख्येने उपस्थित होते.
Tags
rakesh aher deola