प्रशांत गिरासे -(देवळा प्रतिनिधी)
देवळा शहरात मालेगाव नाक्यावरील जि.प विद्यानिकेतन शाळेजवळील पाणीपुरी आणि भेळ बनविणाऱ्या हातगाडी वरील सिलेंडरच्या नळीमधून गॅसगळती झाल्याने गाडी ने अचानक पेट घेतला सदर घटना ही सोमवार (दि 8) रोजी दुपारच्या सुमारास घडली क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण हात गाडी जळून खाक झाली घटनास्थळी नागरिक लवकर धावून आल्याने पुढील अनर्थ टळला.
सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही आग लागल्यानंतर गाडी मालक श्रवण रामेश्वर साळवे याने लागलीच पळ काढल्यामुळे त्याच्या हाताला किरकोळ भाजले आहे.