📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दुर्दैवी ; रिक्षाचालकावर काळाचा घाला ; रस्त्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

राकेश आहेर | चांदवड देवळा

    देवळा तालुक्यातील रामेश्वर जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या भगुर येथिल महेंद्र रामभाऊ कापसे वय वर्षे ३५ ह्या युवकाला  रस्त्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्याचा जागिच मृत्यू झाला आहे.
     याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकच्या भगुर येथे वास्तव्यास असलेल्या महेंद्र रामभाऊ कापसे हे 
रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.भाऊबीजेसाठी शनिवारी (दि.६)रोजी आपल्या स्वतःच्या रिक्षेने पत्नीला माहेरी देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथे पोहचवायला येत असताना रस्त्यातच अचानक त्यांच्या छातीत दुःखु लागल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबवली मात्र काही कळायच्या आतच काळाने घात केला अन् ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रामेश्वर ता.देवळा शिवारातील करला धरणाजवळ घडली.पत्नीने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आर्तहाक देत मदतीची याचना केली यावेळी काही नागरीकांनी तात्काळ उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. ऐन दिवाळीत कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
     दिवाळीचा सण म्हटले की नात्यांचा सण असतो. या सणाला घरातले सगळे एकत्र येत आनंदोत्सव साजरा करतात. पण हा आनंद मात्र कापसे कुटुंबाच्या नशिबी नव्हता.  या आनंदावर विरजण घालवणारी ही घटना घडली आहे. 
    याबाबत देवळा पोलिस ठाण्यात एकनाथ उत्तम शिंदे रा.वाखारी ता.देवळा यांनी फिर्याद दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.यासंदर्भात पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने