📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नियोजित मालेगाव जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भाजप, युवा नेते डॉ. अद्वय (आबा) हिरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवणार

नियोजित मालेगाव जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका, भाजप युवा नेते डॉ. अद्वय (आबा)हिरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली  लढवणार आहे, डॉ. अद्वय आबा हिरे-पाटील यांनी भाजप पक्ष सोडला नव्हता, या नियोजित मालेगाव जिल्ह्यातील पक्षाची धुरा तेच सांभाळतील सर्व निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावरच आहे,  सुनील आबा गायकवाड व त्यांच्यात असलेले गैरसमज दूर झाले आहेत ते एकत्रितपणे सबका साथ, सबका विकास.. करतील असे माजी मंत्री मां. आ. गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितले..

मा. मंत्री आ. गिरीश भाऊ महाजन, मा. मंत्री आ. जयकुमार भाऊ रावल यांच्या समवेत डॉ. हिरे-पाटील, सुनील (आबा) गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्या बैठकी प्रसंगी महाजन यांनी वरील सूचना केल्या आहेत या बैठकीत नियोजित मालेगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका डॉ. अद्वय (आबा) हिरे-पाटील यांच्या नेतृत्वाखालीच संपन्न होतील, असे म्हणाले,
 यावेळी मा. मंत्री महाजन, व मा. मंत्री रावळ यांनी अद्वय (आबा) हिरे पाटील यांनी भाजप पक्ष सोडला नव्हता असे स्पष्ट स्पष्ट केले,
 सुनीलआबा गायकवाड व हिरे-पाटील यांच्या मधील गैरसमज, मतभेद होते ते दूर झाले असून हिरे-पाटील यांच्या सक्रीयतेमुळे, भाजपा नियोजित मालेगाव जिल्ह्यात पुन्हा बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले..
यावेळी युवा नेते डॉ. अद्वय (आबा) हिरे-पाटील म्हणाले की मी पक्ष सोडलाच नव्हता, फक्त तटस्थ होतो, भाजपाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून सगळ्याच निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवणार आहे,  सुनीलआबा गायकवाड व माझ्यातील गैरसमजुती मधून मतभेद होते, ते आता दूर झाले असून, आम्ही एकदिलाने पक्ष बळकट करणार आहोत.

सुनील आबा गायकवाड यावेळी म्हणाले की  आम्ही सगळे भाजपा पदाधिकारी युवानेते माननीय पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत,  आमचा आता कोणताही दूरावा नाही.

 दीपक पवार म्हणाले की माझी शिष्टाई फळाला आली असून भाजपाला ही राम-लक्ष्मणाची जोडी म्हणजे दोन्ही आबा पक्षाला नेत्रदीपक यश नक्कीच प्राप्त करून देतील...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने