मालेगाव (जय योगेश पगारे) मालेगांव शहरात सध्या गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक कमी होत असल्याचे दिसत आहे, अमली पदार्थ, चरस गांजाची वाहतूक तसेच जवळ बाळगणे प्रकरणी अनेक गुन्हे मालेगाव उघड झाले आहेत, यातच अनेकदा गावठी कट्टे, तलवारी, प्राणघातक हत्यारे विनापरवाना बाळगत असणाऱ्यांना अनेकांना अटकही करण्यात आली आहे. यातच एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून कुसुम्बा रोडवर एकावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इरफान काल्या असे आरोपीचे नाव असून बायकोबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा संशयाने त्याने फायरिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबत अशपाक शाह मुक्तार शाह या रिक्षाचालकाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तो काल सायंकाळी आपल्या रिक्षाने भाडे सोडविण्यात जात असताना कुसुंबा रोड वरील मुरली क्लिनिक च्या थोडे पुढे संशयित आरोपी सय्यद इरफान सय्यद इस्माईल उर्फ इरफान काल्या, व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी अशपाक मुक्तार शहा याला थांबवून दमदाटी व शिवीगाळ करत आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवत असल्याचा आरोप करीत आपल्याजवळ असलेल्या गावठी कट्टा ने पोटात गोळी झाडली
सुदैवाने कमरेला गोळी लागल्याने रिक्षाचालकाचा जीव बचावला, त्याच्यावर मालेगांवातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
देशी-विदेशी कट्ट्यांचा वापर करून मालेगांवात यापूर्वीही असे प्रकार भरपूर वेळेस झाले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले आहे..