📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

बॅडमिंटन खेळत असताना अडकलेले फूल काढण्यास गेलेल्या चिमुकलीचा वीजेच्या धक्क्याने दुदैवी मृत्यू.

नाशिक (रुपेश जगताप) एरवी नेहमी मोबाईलच्या नादात राहणारी मुले  विविध प्रकारचे खेळ खेळावे यासाठी अनेक पालक प्रयत्न करीत आहेत, मुलाचे मोबाईलचे व्यसन सुटावे, यासाठी मैदानी खेळांकडे त्यांचे मन वळवावे असे अनेक तज्ज्ञ सांगतात..

परंतु आज नाशकात बॅडमिंटन खेळत असताना त्याचे अडकलेले फुल लोखंडी पाईपने काढताना विजेचा शॉक लागून शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोनाली दिनकर निकुंभ (वय 11)  ही चिमुकली आपल्या मैत्रिणी सोबत आज सायंकाळी बॅडमिंटन खेळत होती.

 खेळताखेळता बॅडमिंटन चे फुल घराजवळील वीजप्रवाह असलेल्या तारेत अडकले. सोनाली आणि मैत्रिणीने फुल काढण्यासाठी मोठी कसरत केली मात्र फुल निघेना. फुल काढण्यासाठी सोनाली घराच्या टेरेस वर जाऊन काही लांब वस्तू शोधत असतांना दुर्दैवाने तिच्या हातात लोखंडी पाईप हाती लागला. त्याने ते फुल काढत असतांना तारेतील वीज प्रवाह लोखंडी पाईपला लागताच सोनालीला जोरदार झटका लागला, त्यात ती बेशुद्ध झाली. आजूबाजूला माहिती समजताच त्यांनी सोनालीला उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे तिला मयत घोषित केले. 
दरम्यान मुळे खेळत असताना पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे,वास्तविक सदर घटना कुठेही घडू शकते, लहान मुलांनाही सदर गोष्टीबाबत अवगत करणे अत्यंत आवश्यक आहे, आपल्या घराजवळ विजेचे तार असल्यास आणि मुले बाहेर खेळत असताना पालकांनी मुलांना समजावून सांगावे की या खेळात असे अपघात होऊ शकतात.
किंवा मुले खेळत असताना त्यांच्यावर पालकांनी लक्ष द्यावे.
ही दुर्दैवी घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने