📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शहीद जवानांना अनोखी मानवंदना; कुटुंबीयांना भेटून मिष्टान्न व फराळाचे वाटप

मालेगाव ( जय योगेश पगारे )
काल दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी मालेगाव येथील शहिद भगतसिंह सेना व MH41 Army Warrirors तर्फे नाशिक जिल्ह्यातील भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्ताने भेटवस्तू देऊन त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.!

भारतमातेच्या पर्यायाने भारत देशाचे नागरिक असणाऱ्या आपल्या सारख्या लोकांच्या रक्षणासाठी आपले देह अर्पण करणाऱ्या वीर जवानांचे आपण काही देणे लागतो या जाणिवेतून तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांना देखील आपुलकीची जाणीव व्हावी या उदात्त भावनेतून शहीद भगतसिंग सेना व MH41 Army Worriors तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केवळ भेटवस्तू न देता त्यांच्या अडीअडचणी देखील जाणून घेण्यात आल्या तसेच संघटनेच्या माध्यमातून या अडचणींवर मात करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल याची ग्वाही देत तुझा पुत्र, पती, भाऊ, यांनी पाठवलेले प्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत अशी भावना या वेळी एम एच 41 आर्मी वॉरियर्स तर्फे सर्व कुटुंबांना व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने