📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

गर्लफ्रेंड च्या मौजेसाठी इंजिनियर बनला चोर; तिची चैन पुरवायला केले तब्बल 56 गुन्हे..

नाशिक  | प्रशांत गिरासे
प्रेम हे आंधळ असतं, आज पर्यंत ऐकल आहे,  पण प्रेम काय काय करायला लावते याची  वेगवेगळी प्रकरणे समोर येत असतात,
अशातच गर्लफ्रेंडच्या चैनेसाठी चैन स्नॅचिंग करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाकडून नाशिक पोलिसांनी तब्बल ५६ गुन्ह्यांची उकल केलीय,नाशिक पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाई ३ सराफ व्यवसायिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की उमेश पाटील नामक उच्चशिक्षित इंजिनिअर आपल्या प्रेयसीसाठी चेन स्नॅचिंग करत गुन्हेगार बनला, इतर महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन ओरबाडत तो आपल्या प्रेमिकेचे लाड पुरवत होता, या पठ्ठ्याने नाशिक शहराच्या विविध भागात तब्बल ५६ चैन स्नॅचिंग करत नाशिक पोलिसांना सळो की पळो करून सोडलं होत..
शिक्षणान तो इंजीनियर आहे मात्र इंजीनियर असलेल्या या तरुणांन इतक्या चैन स्नॅचिंग का केल्या असाव्या या प्रश्नाच उत्तर जे पोलीस तपासात समोर आलंय ते धक्कादायक आहे..
या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंड च्या मौजेसाठी आणि रोलेट या ऑनलाइन जूगारासाठी या चोऱ्या केल्याची कबुली त्याने स्वता पोलिसांना दिलाय, या गुन्ह्यात पोलिसांनी त्याचा साथीदार तुषार ढिकले, सराफ व्यावसायिक गोपाळ गुंजाळ आणि अशोक वाघ यांना देखील बेड्या ठोकल्या आहेत.






दीपककुमार पांडे - पोलीस आयुक्त नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने