📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात, दोन जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

मालेगाव (जय योगेश पगारे | आझम खान ) मालेगाव शहराजवळील चाळीसगाव फाट्याजवळ आराम हॉटेल समोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक गंभीर जखमी आहे,

याबाबत सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळच्या सुमारास  RJ06GD7232 या ट्रेलरने दुचाकी MH41M 6055 या वाहनावरून जाणाऱ्या युवकांना जोरदार धडक दिली त्यामुळे दुचाकी वाहनावरील दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला, हा अपघात इतका भीषण होता की अपघात झालेल्या तरुणाचे व लहान मुलाचे शरीर अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडले होते, 
या अपघातात हॉटेलवर चहा नाश्त्यासाठी फिरस्तीवर गेलेल्या शेख इरफान शेख राजू (19), रा. मालेगाव , सय्यद मोहम्मद जादैन शहजाद अली (14) रा. भिवंडी यांच्या अंगावरून  ट्रक चे मोठे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे होऊन, मांस रस्त्यावर चिकटले होते, मृत्यू झालेला 14 वर्षीय मुलगा भिवंडी येथून मालेगाव येथे लग्नासाठी आला होता.याशिवाय त्यांच्याबरोबर असलेला एक युवक गंभीर जखमी झाला आहे, 
सदर दुर्दैवी घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर आराम हॉटेल च्या समोर घडली , स्थानीय नागरीक व समाजसेवकांनी याबाबतची माहिती मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला दिली व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने सदर  मृतदेह व जखमी युवकाला सामान्य रुग्णालय येथे आणले, 

 महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सर्विस रोड नसल्यामुळे सुरूच आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगीतले, या ठिकाणी वारंवार सर्व्हिस रोडची मागणी करून अद्याप पावेतो संबंधित विभागातर्फे कारवाई करण्यात आली नाही याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने