📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघातात नाशिकचे तिघे जागीच ठार

दिनेश पगारे | नाशिक
नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे परिसरात हॉटेल अन्विता समोर आज बुधवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास उभ्या आयशरवर कार जाऊन आदळल्याने कारमधील तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. मयत तिघेही मॅनकाइंड औषध कंपनीचे एम.आर. होते
पुणेहून कंपनीची मीटिंग आटोपून नाशिककडे हे तिघे जण स्विफ्ट कार क्र. MH15CT1721 ने निघाले होते, त्यांचे वाहन नांदुरशिंगोटे परिसरात आले असता, अंदाज न आल्याने हॉटेल अन्विता समोर उभ्या आयशर क्र. TS30T8886 ला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली, 
हा अपघात इतका भीषण होता की यामुळे कारचा चक्काचूर झाला त्यामुळे कारमधील शरद गोविंदराव महाजन (39) रा. म्हसरुळ, नाशिक, भूषण बाळकृष्ण बदान (36) रा. पाथर्डी फाटा, नाशिक, राजेश तिवारी (34) रा. कल्याण, ठाणे हे तिघे जागीच ठार झाले.
 या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची समस्याही निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी ॲम्बुलन्स मागविली,  तिन्ही मृतदेह दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवगृहात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने नांदूर-शिंगोटे आऊट पोस्ट येथे आणली. दरम्यान सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नाशिक फार्मा असोसिएशनतर्फे अपघातात मरण पावलेले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने