📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावात विशेष पोलीस पथकाच्या कारवाईत १३७ किलो गांजा जप्त तर ११ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त..

मालेगाव (मनोहर शेवाळे) मालेगाव अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेले विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रविवारी (दि. १७) पहाटे २.३० वाजेच्या सुमारास तब्बल सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत एका संशयितास बेड्या घातल्या असून, अन्य दोघे फरार आहेत. संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सायने शिवारात अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे समजल्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. गुफरान शकिल अहमद (वय ३०, रा. इस्लामपुरा, मालेगाव), इरफान व याकुब (पूर्ण नाव माहीत नाही. दोघे रा. मालेगाव) या तिघांच्या ताब्यात असलेल्या कार (एमएच ४८ ए ६८८९) मध्ये संशयास्पदरीत्या सहा गोणी मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता, यामध्ये बेकादेशीररीत्या १३७ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गुफरान शकिल अहमद याला ताब्यात घेतली तर अन्य दोघे फरार झालेत.
पोलिसांनी मुद्देमालासह कार व संशयितास तालुका पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. या १३७ किलो गांजाचे ६६ नग विक्रीच्या उद्देशाने ते वाहतूक करीत असल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी या कारवाईत सात लाख रुपये किमतीचा गांजा व कार असा एकूण ११ लाख ८९ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यया कारवाईत अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखा यांनी काम पाहिले सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने