प्रशांत गिरासे (नाशिक प्रतिनिधी) लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर बस क्र. एम एच 14/36 41 ही बस आज सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश घेत असताना कंटेनर क्र. एमएचवाय 4763 ने धक्का दिल्याने बसचा चालक एस. पी.निकम यांनी खाली उतरून पाहणी करीत असताना घाबरलेल्या कंटेनर चालकाने गाडी तशीच पुढे काढत एसटीचालकास फरफटत नेले. यामुळे एसटी चालकाचे देहाचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी.निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लासलगावकर सुन्ना झाले. संतप्त बसचालक व वाहक तसेच लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले आणि या घटनेमुळे काही काळ बससेवा बंद पडली.
नाशिक येथून बसचालक एस. पी.निकम हे लासलगाव येथे आले.सकाळी बस स्थानकावर चालक एस. पी.निकम यांनी लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांचेसह चहा घेतला व बस आगारातून बस घेऊन रस्त्याने बस स्थानकात आत घेत असताना
बसला कंटेनरने धक्का दिल्याने अपघात झाला.
मात्र अपघातानंतर हा कंटेनर चालक भरघाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार व सलिमभाई कलरवाले यांचे दुकानांना धडका देत व एका स्कूटी गाडीला धडक देत हा कंटेनर थांबला.
या अपघातात चालक निकम यांच्या मृतदेहाचा रस्त्यावर
अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले व चालक निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून अँम्ब्ल्युन्समध्ये
टाकले व रस्ता पाण्याने धूवून घेतला
या घटनेचे वृत्त समजताच राज्य परिवहन मंडळ नाशिक विभाग प्रभारी नियंत्रक मुकुंद कुंवर, विभागीय अधिकारी कैलास पाटील, सुरक्षा अधिकारी अजित भारती व कामगार अधिकारी शेख हे लासलगावी दाखल झाले आहेत. दरम्यान लासलगावमध्ये या अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.