📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नामपूर बाजार समितीचे गेटवर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन 'हे' आहे कारण

नामपूर | सतिश कापडणीस

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नळकस रोडवरील आवारात कांदा लिलावासाठी आलेल्या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट अनेकदा चोरीस जात असल्याने याबाबत बाजार समितीला कळवून सुध्दा प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने संताप व्यक्त करत दोन तास ठिय्या आंदोलन करत लिलाव बंद झाले.
  आज सकाळ सत्रात द्याने येथील शेतकरी अक्षय कापडणीस यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरीस गेल्याचे समजले बाजार समिती कार्यालय येथे माहिती देऊन सुद्धा याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बाजार समिती प्रवेशद्वारावर दोन तास ठिय्या आंदोलन करत लिलाव ठप्प झाल्याने बाजार समिती सभापती व संचालक समक्ष येऊन ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत लिलाव बंदच राहतील हि भुमिका घेतल्याने लिलाव ठप्प झाल्याने बाजार समितीच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या बाजार समिती आवारात मोसम व साक्री तालुक्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी नामपूर येथे रात्रीच्या वेळेस मुक्कामाला येत असतात. 

  यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या
* बाजार समितीच्या आवारात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा
* बाजार समिती आवारात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी 
* बाजार समितीतयेणाऱ्याा वाहनांना टोकन पध्दतीने प्रवेश द्यावा आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या  

 🎤बाजार समिती आवारात शेतक-यांच्या वाहनांसाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात येईल व बाजार समिती आवारात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल - शांताराम निकम, सभापती नामपूर बाजार समिती

 🎤 नामपूर बाजार समिती आवारात कांदा लिलावासाठी आलेल्या वाहनांचे वस्तु चोरीस जातात याबाबत उपाययोजना करणे जरूरीचे आहे- अक्षय कापडणीस,शेतकरी,द्याने



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने