देवळा: ज्ञानेश्वर आढाव
निंबोळा : रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन व ग्रामपंचायत निंबोळा यांच्या संयुक्त विद्यमाने गाव व परिसरातील महिलांची गर्भाशय व स्तन कॅन्सर तपासणी करण्यात आली. शिबीराचे उद्घाटन भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रवी निकम व प्रकल्प संयोजक सतिष कलंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच प्रदीप निकम, उपसरपंच गोरख देवरे,रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, प्रकल्प संयोजक केशव खैरनार, अरुण सावंत,विनोद गरुड,भारती सावंत, छाया देवरे,सुशिला तलवारे आदी उपस्थित होते. रोटरी अमरावती मिडटाऊनचे मॅमोग्राफी व्हॅन व्यवस्थापक उदय निंभोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ ऐश्वर्या गायगोले, तंत्रज्ञ स्वाती तुमसरे, निलीमा वानखडे, आरती जांभूळकर, सतिष गाडे यांच्या पथकाने शिबीरात महिलांची तपासणी केली. या शिबिरात ७८ महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी सतीष कलंत्री,राजेंद्र दिघे यांनी महिलांच्या आरोग्य तपासणी बाबत माहिती दिली. या शिबिरासाठी ग्रामसेवक अमोल खैरनार, सागर गरुड, रवी जाधव, भाऊसाहेब निकम, शिवाजी पगारे, सुखदेव सावंत, गबाजी निकम, निंबा वाघ भाऊसाहेब यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांनी पुढाकार घेतला.