ज्ञानेश्वर आढाव | देवळा प्रतिनिधी
देवळा तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या बाबतीत चर्चेत असलेले गाव म्हणजे दहिवड, आज दहिवड ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी,शाळांना सॅनिटायझर मशिन चे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ॲटिजेन टेस्ट किट, पशुवैद्यकीय दवाखानाल्या लंपी आजारांवर गुरे मालकांना औषध पुरवठा केला गेला.
यावेळी दहिवड ग्राम पंचायत सरपंच आदिनाथ ठाकूर, उपसरपंच मनिष ब्राह्मणकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय सूर्यवंशी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
दहिवड ग्राम पंचायतीचने केलेल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व घटकांच्या वतीने ग्राम पंचायतीचे आभार मानले.