📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ब्रेकिंग:- इगतपुरीतील घाटनदेवी मंदिरा समोरील दुकानात घुसले पिकअप वाहन, मंदिरातील पुजारी ठार, एक गंभीर जखमी

इगतपुरी - मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या पूजेच्या दुकानात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली, या अपघातात मंदिरातील पुजारी ठार, तर दोन जण गंभीर जखमी असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अपघात एवढा तीव्र होता की परिसरात मोठा आवाज झाला,  नशीब बलवत्तर म्हणून दुकानदारांची 3 मुले बाहेर खेळत असल्यामुळे वाचली
याबाबत याबाबत सविस्तर वृत्त असे की घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या पूजेच्या दुकानात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने पिकअप बॅरिकेट्स तोडून सरळ दुकानात घुसली,  सुदैवाने नवरात्र संपल्यामुळे आज दर्शनासाठी जास्त गर्दी नव्हती. गर्दी असती तर खूप मोठा अपघात झाला असता,
 दोन जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे

सुदैवाने दुकानदारांची 3 मुले बचावली
 दुकानदाराची तीन मुले बाहेर खेळत असल्यामुळे या अपघातातून बचावली अन्यथा खूप मोठी जीवित हानी झाली असती, परंतु अपघातामुळे दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असून त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने