📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाशिक जिल्ह्यात बागलाण मध्ये सप्तश्रृंगीच जागृत देवस्थान

प्रशांत गिरासे | नाशिक
देवीचं अर्धपीठ म्हणून वणीच्या सप्तश्रृंगी देवीची  सर्वदूर ओळख आहे.याच सप्तश्रृंगी गडासमोर देवीच आणखी एक ठिकाण आहे, असं सांगितल्यावर कुणाला चटकन विश्वास बसणार नाही.मात्र बागलाण तालुक्यातील तरसाळी गावानजीक कपाळी डोंगरावर सप्तश्रृंगी देवीच
  पुरातन आणि जागृत देवस्थान वसलंय.कपाळी डोंगरावर कपारात हे स्थान असल्याने कपाळ भवानी म्हणूनही देवी परिचित आहे.या डोंगरावर गुहेसारखी कपार  असुन, त्यातल्या पहिल्या भागात देवीचं अधिष्ठान आहे. विशेष म्हणजे कितीही दुष्काळ पडला तरीही या गुहेतलं पाणी आटत नाही. भवानी माता मंदिर परिसर चौफेर वनराईने नटलेला आहे.तरसाळी,पदाचे, कौतिकपाडा,विनोदी, भंडारपाड्यासह पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येने मातेच्या दर्शनासाठी येत असतात.काही भाविक नवस फेडण्यासाठी काही चक्रपूजेसाठी तर काही घटी  बसण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव इथं दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.विशेष म्हणजे काही भाविक हे ठिकाण नांदुरी गडावरच्या देवीचं प्रतिरुप मानतात.म्हणूनच 2 हजार फूट उंचीवर असतानाही इंथनवरात्रोत्सवानिमित्त मोठी गर्दी दिसतेय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने