🔴 माजी आमदार शेख रशीद राष्ट्रवादीच्या वाटेवर
मालेगाव (मनोहर शेवाळे) गेल्या आठवड्यात मालेगाव मध्यचे माजी आमदार व माजी महापौर यांनी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता थेट त्यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा खुलेआम सल्ला दिला आहे.यामुळे मालेगाव मधून काँग्रेस पक्षाचा सफाया होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.मालेगाव मध्य हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.स्वतः रशीद शेख दोनदा आमदार पक्षाकडून आमदार राहिले तर एकदा त्यांचे सुपुत्र आसिफ शेख यांनी आमदार पद भूषविले आहे.महापालिकेतही काँग्रेसची सत्ता आहे.सध्या काँग्रेस पक्षाचे २५ नगरसेवक असून रशीद शेख यांच्या पत्नी ताहेरा शेख महापौर आहे. आता शेख यांनी कार्यकर्त्यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याने काँग्रेस पक्ष काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या राजीनामा देण्याच्या या निर्णयाचा फायदा दुसऱ्या पक्षांनी घेऊ नये व त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली संभ्रमावस्था बघून त्यांच्यात फूट पडू नये यासाठी आपण स्वतः राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे त्यांनी दर्शविले, आपले समर्थक, कार्यकर्ते यांनी आसिफ शेख यांच्या सोबत चालले जावे असे सरळ आवाहन शेख रशीद यांनी यावेळी केले.
यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता राजकारणात या गोष्टी घडत असतात योग्य वेळ आल्यावर मी व माझे विद्यमान नगरसेवक योग्य निर्णय घेऊ एका पत्रकाराने विचारले की तुम्ही काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी हे दबावतंत्र म्हणून वापर करत आहात का? त्यावेळी यांनी सांगितले की मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही पण पुढील गोष्टी वेळ ठरवेल आणि राज्यात आधीच तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे मी राष्ट्रवादीचा पुरस्कार करतोय असे असले तरी ते योग्यच आहे, याने जास्तीत जास्त पक्ष मला पक्षातून काढून टाकेल आणि मी पण त्याचीच वाट पाहतोय असे हसत हसत बोलले.
मी स्वतः पुढे कुठल्याही निवडणुकीत सहभागी होणार नाही, त्यामुळे माझ्या समर्थकांनी आसिफ शेख यांची साथ द्यावी अशी विनंती वजा सूचना यावेळी शेख रशीद यांनी आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना केली. काही लोकांना असे वाटत होते की आम्ही म्हणजे बापलेकांत आत काहीतरी मतभेद सुरू आहे, परंतु तसे काही नसल्याचे समर्थकांनी या गोष्टी बाबत संभ्रमावस्थेत राहू नये म्हणून त्यांनी यावेळी ही बाब खोडून काढली.
दरम्यान ज्यावेळी शेख रशीद यांनी राजीनामा दिला त्यावेळेस ते राष्ट्रवादीच्या वाटेवर होते हे ये त्यांनी स्वतः मान्य केले त्यांच्या या गोष्टीचा फायदा विरोधकांना होऊ नये कार्यकर्ते फुटू नाही म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरळ सरळ कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी जाण्याचे आव्हानच करून टाकले.
मालेगाव शहरातील राजकारण होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आणखीनच ढवळून निघण्याची चिन्हे या गोष्टीवरून दिसत आहे, महा विकास आघाडी ला तीन पक्षांच्या आघाडीमुळे मालेगावात तरी फायदा होतो की नुकसान हे काळ ठरवेल पण सध्या मालेगावात काँग्रेस फक्त या दोघे पिता-पुत्रांनी जिवंत ठेवले होते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मालेगावात काँग्रेसचे भवितव्य अधांतरी..
मालेगाव शहरात मुस्लिम मतदार संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे सहाजिकच काँग्रेस, राष्ट्रवादी, एम आय एम, जनता दल आदी प्रमुख पक्ष मानले जातात त्यातच महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे, शहरात काँग्रेसचा बालेकिल्ला केवळ या पिता-पुत्रांनी मुळेच अबाधित होता, परंतु आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते, अशातच शेख रशीद यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिल्याने काँग्रेसचा सुपडा साफ होणार की काय ?अशी चर्चा मालेगावच्या राजकारणात रंगली आहे
शेख रशीद आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांची भूमिका नेमकी काय?
मालेगावातल्या राजकारणाची ही उलटापालट बघता काँग्रेसला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून अंतर्गत नाराजी बाजूला सारून महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार आहे, मालेगावातील मतदारांची विचारसरणी एकतर्फी होती परंतु आता पुष्कळ बदल घडले आहेत शेख रशीद यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग मालेगावात आहे, आसिफ शेख जेव्हापासून राष्ट्रवादीत गेले आहे तेव्हापासून मालेगावातील मध्य मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकत वाढली होती, परंतु जर शेख रशीद व त्यांचे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादीची ताकत दुप्पट होणार असून यामुळे मालेगावातील राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे लागेल अन्यथा मालेगावातील काँग्रेसचे अस्तित्व डगमगण्याची चिन्हे आहेत.