📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

माजी आमदार शेख रशीद यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा; मालेगावात राजकीय चर्चांना उधाण!


मालेगाव (मनोहर शेवाळे) मालेगाव मध्यचे माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून शहरातील राजकिय गणित बदलेले आहेत. त्यातच आज कॉंग्रेसचे माजी आमदार, माजी महापौर व विद्यमान कॉंग्रेस नगरसेवक रशीद शेख यांनी देखील प्रकृतीच्या कारणास्तव मालेगाव शहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने शहरात राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रशीद शेख यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांना इमेलद्वारे आपल्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. मात्र यापुढे सतत पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचे म्हटले असले तरी यात पुढे राजकीय भूकंप होणार असल्याची शहरात चर्चा आहे. शेख यांच्या राजीनाम्याने अनेक राजकीय तर्क वितर्क व्यक्त होत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने