मनमाड ( मनोहर शेवाळे) बालगुन्हेगार म्हटले की सामान्यपणे झोपडपट्टीतील टिवल्याबावल्या करणारा, प्लॅटफॉर्मवर चार मुलांबरोबर फिरणारा मुलगा डोळ्यासमोर येतो. कधी पोटाची भूक शमवण्यासाठी, कधी मित्रांबरोबर पिक्चर बघण्यासाठी, कधी घरांतील हालाखीची परिस्थिती, त्यांना असणारी संगत अशी पार्श्वभूमी त्यांच्या कृत्यामागे असते. मात्र, गुन्हेगारीचे हे विश्व केवळ गरीबांच्या झोपडीपुरतेच नाही तर मध्यमवर्गीयांच्या फ्लॅट आणि श्रीमंतांच्या बंगल्यांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळेच या प्रश्नाला तितकेच महत्त्वाचे सामाजिक कंगोरेही आहेत. मुलांबरोबर हॉटेलिंगपासून पिकनिकपर्यंत वेगवेगळी मज्जा करण्यासाठी, मोठमोठ्या गाड्यांच्या लोभापायी किंवा छानछोकीसाठी, नकार ऐकण्याची सवय नसणे, हवी असलेली गोष्ट मिळायलाच हवी अशा अनेक कारणांमुळे आज बालगुन्हेगारी ‘मोठी’ होताना दिसतेय.
अशातच मनमाड येथील धक्कादायक घटना समोर येत आहे बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून 4 बाल गुन्हेगार झाले फरार झाले असून मनमाड रिमांड होम मधील घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे
या चारही बाल गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे...
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या बाल गुन्हेगारांचा घेताय शोध...