📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महिलेवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेने जिल्हा हादरला; वणी बसस्थानकातील प्रकार; चौघे संशयित अटकेत!

मालेगाव (मनोहर शेवाळे) राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, राज्य सरकार इतर गोष्टींमध्येच व्यस्त आहे का? कायदा व सुव्यवस्थेचा पुर्ण बोजवारा उडालेला असून, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी असलेली पोलिस यंत्रणा ही सध्या काय करत आहे?? असे प्रश्न जनता विचारत आहे  

 बुधवारी (दि.२७) वणी येथे ४५ वर्षीय महिलेवर चौघां संशयितांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून चौघा संशयिंतांना वणी पोलिसांनी अवघ्या चार तासात बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणींसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला असून बुधवारी (दि.२७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ४५ वर्षीय पिडीत महिला एका व्यक्तीसोबत उभी असतांना दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी तिला बळजबरीने ओसाड जमिनीकडे ओढून नेले.

 या दोघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तेथे आलेल्या त्यांच्या दोघा साथिदारांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती महिलेच्या सोबत असलेल्या व्यक्तीने स्थानिक पोलिसांनी दिल्याने पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवित चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या. संशयितांनी गुन्ह्याची कुबुली दिली असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने