📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विशेष महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांचे चरस सह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव (मनोहर शेवाळे) काल बुधवार ता. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास विशेष महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १,४५ हजार रुपयांचे चरस (charas) जप्त करण्यात आले आहे. आरोपीने हे चरस जुना आग्रा रोड लगत असलेल्या नॅशनल पेट्रोल पंपाजवळ विक्रीसाठी लपवून आणले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची मोठी किंमत मिळते. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मालेगावात विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाकडून ही करण्यात आली या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
(Special task force seized charas in Malegaon)
याप्रकरणी 1) मोहमंद सईद फारुख कुरेशी, 2) रफीक मोहमंद याकुब 3) मोहमंद आमीन समीउल्ला अन्सारी  सर्व राहणार मालेगाव, यासह चरससह २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सध्या मालेगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अमली पदार्थ संदर्भात मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई सुरू (narcotics) आहे.मागील आठवड्यात झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला होता आणि आता चरस देखील जप्त करण्यात आल्याने मालेगावात आत्ताची पिढीला आमली पदार्थांच्या नसेखोरीकडे ओढलं जातंय की काय असा सवाल मलेगावकरांच्या मनात उपस्थित होतोय. (Malegaon addiction)
बंदी असूनही ते पदार्थ कुठून व कसे मालेगावात येतात, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. यामागे मोठी टोळी  सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही यात जर तपासाची गती जर योग्य दिशेने गेलेत तर मोठे मासेही गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने