📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

धक्कादायक: शेतातील घरात दरोडा टाकून आठ-दहा नराधमांचा एक महीला व तरुणीवर सामुहिक बलात्कार

पैठण (जय योगेश पगारे) महाराष्ट्र सध्या बलात्कार सत्र सुरू असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे, या गोष्टी थांबण्याचे नाव घेत नसून गुन्हेगारांवरील कायद्याचा वचक उठला असल्याचे संतापजनक प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत आहे

 पैठण तालुक्यातल्या बिडकिन जवळ माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तोंडोळी शिवारातील गट क्रमांक ३१२ मधील शेतवस्तीवर बिहार राज्यातील परप्रांतीय मजूर कामासाठी राहतात. मंगळवारी मध्यरात्री शेतवस्तीवर ८ ते १० दरोडेखोरांनी हल्ला केला. कुऱ्हाडीचा धाक दाखवत घरातील एक महिला व तरूणीवर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर पुरुषांना जबर मारहाण करत लुटमार केली व घरातील रोख रक्कम, मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले. 
या घटनेनंतर पीडित कुटुंबातील सदस्यांनी मोबाईलद्वारे माहिती दिल्यावर पोलीस पथक, फिंगरप्रींट तज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. तर दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले असून या घटनेनंतर जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर, त्यांच्यावर हल्ला करून महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने