📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जायखेडा येथे बँक लुटण्याचा प्रयत्न फसला; तिजोरी उघडता न आल्याने संतापात चोरट्यांनी केली तोडफोड!

जायखेडा (जय योगेश पगारे) जायखेडा एनडीसीसी (नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) चे शटर तोडून बँक लुटण्याचा उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी उघडता न आल्याने हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी संतापात बँकेतील साहित्याची नासधूस करत तोडफोड करून हजारो रुपयांचे नुकसान केले, यामध्ये कंप्यूटर प्रिंटर याची तोडफोड केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की जायखेडा येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असून ही जायखेडा पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे तरीसुद्धा बँकेत चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
बँकेच्या तिजोरीत वीजबिल भरणा व अन्य वसुलीचे मिळून अंदाजे एक लाख ८५ हजार रुपये जमा असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. 
चोरट्यांनी रात्री बँकेचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तिजोरी उघडता न आल्याने चोरी करता आली नाही व तिजोरीतील रक्कम सुरक्षित राहिली.

बँकेतील तिसरा डोळा बंद अवस्थेत?
सदर बँकेत सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ते बंद अवस्थेत आहे, याशिवाय बँकेतील चोरीच्या प्रयत्न रोखण्यासाठी लावण्यात आलेला अलार्मही वाजत नाही, अशी बिकट अवस्था या शाखेची असल्यामुळे बँकेच्या तसेच खातेदारांच्या जमा रकमेचे संरक्षण कसे होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

या प्रकरणी बँकेचे कर्मचारी निवृत्‍ती निंबा बोरसे यांनी पोलिसात फिर्याद दिली, त्यानुसार अज्ञात इसमावर भादवि कलम 457,380,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ करीत आहेत.
इतर शाखांचीही सुरक्षितता ऐरणीवर..
जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी एनडीसीसी बँकेच्या शाखा आहेत परंतु सर्वच ठिकाणी सुरक्षिततेची वानवा आढळते, जायखेडा येथील प्रकरणात ज्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते त्याच प्रकारे इतर शाखेचे ही तशीच अवस्था आहे का याबाबत बँक प्रशासनाने ताबडतोब कारवाई करणे गरजेचे आहे, बँकेतील अलार्म नादुरुस्त असतील तर ते ताबडतोब दुरुस्ती करणेही गरजेचे आहे, तिजोरी उघडता न आल्याने सुदैवाने जायखेडा येथील रक्कम शाबूत राहिली परंतु चोरट्यांनी तोडफोड केल्यामुळे बँकेचे हजार रुपयांची नुकसानही झाले आहे, निदान या गोष्टीतून धडा घेऊन बँकेने इतर शाखांचे सुरक्षिततेचे नियमन करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने