📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सोयगाव सहा जणांच्या हत्याकांडाला 25 वर्ष पूर्ण; बघा नेमके काय घडले होते त्या रात्री...

मालेगाव ( जय योगेश पगारे) सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सबंध देशाला हादरवणारे पाटील हत्याकांड  आजच्याच दिवशी घडले होते, 
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या सहा जणांचा निर्घुण खून या काळरात्री घडला होता, मालेगावातल्या तत्कालीन सोयगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुन्या सब स्टेशन शेजारच्या शेती वजा फार्म हाऊस मध्ये कृषी अधिकारी सुपडु पाटील यांची त्यांच्या राहत्या घरात आई, पत्नी, दोन मुली व एका मुलाची त्यांच्याच भाऊ व पुतण्याने त्यांच्याच बंदुकीने गोळ्या घालून सहाही जणांची हत्या केली होती.
हा थरारक हत्याकांड कोजागिरी पौर्णिमेचे रात्री घडला होता, कृषी अधिकारी सुपडु पाटील यांची वृध्द आई केशरबाई, पत्नी पुष्पलता, मुलगी पुनम, आणि बंटी ताई, मुलगा राकेश (पप्पू) यांचा त्यांच्याच राहत्या बंगल्यात सुपडु पाटील यांचे बंधू प्रकाश व पुतण्या संदीप यांनी खून केला होता, नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत  हत्याकांडाचा पर्दाफाश करून गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते व त्यांचा हा गुन्हा सिद्धही झाला होता त्यानंतर संदीपची उच्च न्यायालयात मुक्तता झाली होती तर प्रकाश पाटीलला सुरूवातीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली त्यानंतर तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे जन्मठेपेची शिक्षाही पूर्ण झाली आहे.
सुपडू पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यात संपत्तीविषयक वाद होते,  प्रकाश पाटील, सुपडू पाटील यांना सांगत असत की त्यांच्या जमिनीचे विभाजन करावे आणि जमिनीचा त्याचा वाटा त्याच्या ताब्यात द्यावा, सुपडू पाटील टाळत होते आणि नंतर विचार करू असे प्रकाश पाटील यांना सांगत, त्यामुळे आपापसात भांडणे, शिवीगाळ नेहमीच होत असे.

घटनेच्या वेळी प्रकाश पाटिल नाशिकला राहत होता तर मुलगा संदीप पुणे येथे इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षी शिकत होता व पुण्यातच होस्टेलमध्ये राहत होता

सुपडु पाटील यांच्याकडे बरेच सालदार कामाला होते त्यापैकी एक व्यंकट पगारे नामक व्यक्ती त्यांच्या बंगल्यापासून सुमारे पन्नास फुटावरील शेडमध्ये राहत होता, एकदा उन्हाळ्यात व्यंकट पगारे झाडांना पाणी देत ​​होता, तेव्हा प्रकाश पाटील आणि सुपडू पाटील यांच्यात भांडण आणि शिवीगाळ झाली आणि आणि प्रकाश पाटीलने  धमकी दिली की तो त्यांना मारून टाकेल, असे व्यंकट पगारे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

23.10.1996 (बुधवार) संध्याकाळी  जेव्हा ते व्यंकट पगारे  गोठ्याकडे दूध घेण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांनी संदीपला  पाटलांच्या बंगल्यात  
सूटकेस आणि खांद्यावर शबनमची बॅग घेऊन  जाताना दिसला,  दुसऱ्या दिवशी (गुरुवारी)  रात्री ९ वा.  सुपडू पाटीलच्या घरात संदीपला पाहिले. सुपडू पाटील, त्यांची पत्नी पुष्पाताई, त्यांची आई केसरबाई, त्यांच्या मुली पूनम आणि बंटीताई आणि त्यांचा मुलगा राकेश उर्फ ​​पप्पू हेही तिथे उपस्थित होते त्याने आपले जेवणाचा डबा आणि एक खाट घेतली आणि नंतर आपल्या शेडमध्ये झोपी गेला.

25.10.1996 रोजी सुमारे 2.30 ते 3 वाजेला त्याने सुपडू पाटील यांच्या बंगल्याच्या बाजूने दोन गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला. त्याने बंटीताईंना 'आई गं' ओरडुन रडताना ऐकले आणि त्यानंतर केसरबाईंना 'शांत हो' म्हणताना ऐकले. यानंतर त्याला आणखी दोन गोळ्यांचा आवाज ऐकू आला, सुपडू पाटील आपल्या बंदुकीने डुकरांना गोळ्या घालत असत आणि आत्ता पण डुकरांवर गोळीबार करत असावा असा अंदाज आल्याने व्यंकट पगारे झोपून गेला. सकाळी तो अंथरुण आवरत असताना, सुरेश नामक व्यक्ती जो सुपडू पाटील यांच्या फार्म हाऊसवर राहत होता तो सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर दूध काढण्यासाठी बादली आणायला गेला होता, त्याला बंगल्याचा दरवाजा बंद आणि कुलूप लावलेले होते त्यावर एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिलेले होते की  "आम्ही सर्व बाहेरगावी जात आहोत आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतणार आहोत, तोपर्यंत सर्व कामे थांबवावीत" सुरेशने ती चिठ्ठी व्यंकट पगारेला दिली, तोपर्यंत सालदार काम करणारा सुभाषही तेथे आला

व्यंकट ने सुरेश आणि सुभाषला रात्री ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या,  त्याने ती चिठ्ठी घेतली आणि सुभाषला विजूताईला (विजू ताई या सूपडू पाटलांच्या बहिण होत) बोलवायला सांगितले, सुभाष निघून गेला व विजूताई पती झुंबर पाटील यांच्यासह आले...

क्रमशः..
( उर्वरित उद्या भाग दोन मध्ये वाचा )

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने