सोयगाव ( जय योगेश पगारे)
(भाग एक वाचला असेल तर भाग 2 खाली स्क्रोल करुन वाचता येईल)
भाग 1
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सबंध देशाला हादरवणारे पाटील हत्याकांड आजच्याच दिवशी घडले होते,
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या सहा जणांचा निर्घुण खून या काळरात्री घडला होता, मालेगावातल्या तत्कालीन सोयगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुन्या सब स्टेशन शेजारच्या शेती वजा फार्म हाऊस मध्ये कृषी अधिकारी सुपडु पाटील यांची त्यांच्या राहत्या घरात आई, पत्नी, दोन मुली व एका मुलाची त्यांच्याच भाऊ व पुतण्याने त्यांच्याच बंदुकीने गोळ्या घालून सहाही जणांची हत्या केली होती.
हा थरारक हत्याकांड कोजागिरी पौर्णिमेचे रात्री घडला होता, कृषी अधिकारी सुपडु पाटील यांची वृध्द आई केशरबाई, पत्नी पुष्पलता, मुलगी पुनम, आणि बंटी ताई, मुलगा राकेश (पप्पू) यांचा त्यांच्याच राहत्या बंगल्यात सुपडु पाटील यांचे बंधू प्रकाश व पुतण्या संदीप यांनी खून केला होता, नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हत्याकांडाचा पर्दाफाश करून गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते व त्यांचा हा गुन्हा सिद्धही झाला होता त्यानंतर संदीपची उच्च न्यायालयात मुक्तता झाली होती तर प्रकाश पाटीलला सुरूवातीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली त्यानंतर तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे जन्मठेपेची शिक्षाही पूर्ण झाली आहे.
सुपडू पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यात संपत्ती विषयक वाद होते, प्रकाश पाटील, सुपडू पाटील यांना सांगत असत की त्यांच्या जमिनीचे विभाजन करावे आणि जमिनीचा त्याचा वाटा त्याच्या ताब्यात द्यावा, सुपडू पाटील टाळत होते आणि नंतर विचार करू असे प्रकाश पाटील यांना सांगत, त्यामुळे आपापसात भांडणे, शिवीगाळ नेहमीच होत असे.
घटनेच्या वेळी प्रकाश पाटिल नाशिकला राहत होता तर मुलगा संदीप पुणे येथे इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षी शिकत होता व पुण्यातच होस्टेलमध्ये राहत होता
सुपडु पाटील यांच्याकडे बरेच सालदार कामाला होते त्यापैकी एक व्यंकट पगारे नामक व्यक्ती त्यांच्या बंगल्यापासून सुमारे पन्नास फुटावरील शेडमध्ये राहत होता, एकदा उन्हाळ्यात व्यंकट पगारे झाडांना पाणी देत होता, तेव्हा प्रकाश पाटील आणि सुपडू पाटील यांच्यात भांडण आणि शिवीगाळ झाली आणि आणि प्रकाश पाटीलने धमकी दिली की तो त्यांना मारून टाकेल, असे व्यंकट पगारे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
23.10.1996 (बुधवार) संध्याकाळी जेव्हा ते व्यंकट पगारे गोठ्याकडे दूध घेण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांनी संदीपला पाटलांच्या बंगल्यात
सूटकेस आणि खांद्यावर शबनमची बॅग घेऊन जाताना दिसला, दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) रात्री ९ वा. सुपडू पाटीलच्या घरात संदीपला पाहिले. सुपडू पाटील, त्यांची पत्नी पुष्पाताई, त्यांची आई केसरबाई, त्यांच्या मुली पूनम आणि बंटीताई आणि त्यांचा मुलगा राकेश उर्फ पप्पू हेही तिथे उपस्थित होते त्याने आपले जेवणाचा डबा आणि एक खाट घेतली आणि नंतर आपल्या शेडमध्ये झोपी गेला.
25.10.1996 रोजी सुमारे 2.30 ते 3 वाजेपर्यंत त्याने सुपडू पाटील यांच्या बंगल्याच्या बाजूने दोन गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला. त्याने बंटीताईंना 'आई गं' ओरडुन रडताना ऐकले आणि त्यानंतर केसरबाईंना 'शांत हो' म्हणताना ऐकले. यानंतर त्याला आणखी दोन गोळ्यांचा आवाज ऐकू आला, सुपडू पाटील आपल्या बंदुकीने डुकरांना गोळ्या घालत असे आणि आपण डुकरांवर गोळीबार करत असावा असा अंदाज आल्याने व्यंकट पगारे झोपून गेला. सकाळी च्या सुमारास तो अंथरुण आवरत असताना, एक सुरेश नामक व्यक्ती जो सुपडू पाटील यांच्या फार्म हाऊसवर राहत होता आणि जो सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर म्हशींना खायला चारा आणण्यासाठी व दूध काढण्यासाठी बादली आणायला गेला होता, त्याला बंगल्याचा दरवाजा बंद आणि कुलूप लावलेले होते त्यावर एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिलेले होते की "आम्ही सर्व बाहेरगावी जात आहोत आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतणार आहोत तोपर्यंत सर्व कामे थांबवावीत." सुरेशने ती चिट व्यंकट पगारे ला दिली. तोपर्यंत सालदार काम करणारा सुभाषही तेथे आले. त्याने व्यंकट पगारे
सुरेश आणि सुभाषला रात्री ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या. त्याने ती चिठ्ठी घेतली आणि सुभाषला विजूताईला (विजू ताई यासू पाटलांच्या बहिण होत) बोलवायला सांगितले, सुभाष निघून गेला व विजूताई पती झुंबर पाटील यांच्यासह आले
भाग 2
व्यंकट पगारे यांनी दाराला चिकटवलेली चिठ्ठी झुंबर पाटील यांना दिली झुंबर पाटील यांनी लागलीच गावातील अशोक(अण्णा) बच्छाव यांना कॉल करण्यास सांगितले. माहिती मिळताच अशोक बच्छाव आले. व्यंकट पगारे ने जे काही पाहिले, त्याची माहिती त्यांना दिली. त्यांनी पाहिले की बंगल्याचे दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत आणि स्वयंपाकघरचा दरवाजा आतून बंद आहे. स्वयंपाकघराच्या दाराला बाहेरून ग्रील आणि आतून लाकडी दरवाजा होता. त्यांनी लाकडी दरवाजा आत ढकलला तर तो उघडा होता त्यांना डायनिंग टेबलवर पडलेल्या सुपडू पाटील यांच्या मोबाईल व्हॅनच्या चाव्या सापडल्या ग्रीलमधून बांबू लावून त्या चाव्या काढल्या आणि मग पुष्पाताईंच्या आई-वडिलांच्या घरी लोखडीला एकाला पाठवण्यात आले. त्यानंतर त् अशोकअण्णा आणि इतरांनी सुपडू पाटील यांच्या बंगल्याला फेरी मारली त्यात त्यांना बेडरूमचा खिडकीचा मागचा दरवाजा ढकलला जो उघडा होता त्यात त्यांना सुपडू पाटील आणि पुष्पाताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याच क्षणी व्यंकट पगारे रडू लागला. अशोकअण्णा त्यांना थांबायला सांगून पोलिसांना माहिती देण्यासाठी निघून गेले.
त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले, छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश मोरे यांना टेलिफोन द्वारे कळविण्यात आले की सोयगाव येथील सप्तशृंगी बंगल्यात काही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक शेख , यांनी अशोक बच्छाव इतरांच्या उपस्थितीत पंचनामा यासाठी घराच्या दाराला लावलेले कुलूप तोडले, हे सर्व घरात गेल्यानंतर यांना सहा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.
अशोक बच्छाव यांनी एफआयआर दाखल केली, त्यानंतर घटनास्थळी पोलीस फोटोग्राफरला बनवण्यात आले व फोटो काढून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले, यानंतर अशोक बच्छाव यांनी दाराची ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना दिली.
घराची झडती घेतली असता पोलिसांना सुपडु पाटील यांच्या काळसर रंगाच्या पॅन्ट मध्ये एक चिठ्ठी सापडली, त्यामध्ये संदीप पाटील सुपडु पाटील यांची कन्या पूनम ला राखी मिळाल्याबद्दल धन्यवाद केलेली चिठ्ठी आढळली. त्यामध्ये संदीप राहत असलेल्या पुण्यातील वस्तीगृहाचा पत्ताही होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पोलिसी खाक्या दाखवताच प्रकाश पाटील व संदीप पाटील यांनी गुन्हा कबूल केला त्यानुसार यांना अटक करण्यात आले नंतर न्यायालयात केस चालल्यानंतर दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा, तसेच प्लॅनिंग नुसार शांत डोक्याने घडविलेला हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने प्रकाश पाटील फाशीची शिक्षा सुनावली, त्यानंतर प्रकाश पाटील ने शिक्षा कमी करण्यासाठी अपील केले परंतु न्यायालयाने त्यामध्ये असे म्हटले सांपत्तिक वादातून जर सुपडु पाटील वाटा हिस्सा देत नव्हते तर रागाच्या भरात केवळ त्यांचाच खून केला असता तर न्यायालयाने याबाबतीत विचारही केला असता परंतु स्वतःच्या भावाचा वहिनीचा व मुलांचा याशिवाय जन्मदात्या आईचा ही गोळ्या घालून निर्घृण खून करणे ही गोष्ट साधी नाही, त्यामुळे न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती, परंतु त्यानंतर संदीपची उच्च न्यायालयात मुक्तता झाली. तर प्रकाश पाटील यांना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. चांगल्या वर्तणुकीमुळे नंतर त्यांची जन्मठेपेची शिक्षाही पूर्ण झाली आहे.
केवळ सांपत्तिक वादातून घडलेल्या या भयानक हत्याकांडाच्या आठवणी आजही ताज्या आहेत .
भाऊबंदकी वाटे-हिश्श्ये या गोष्टीत न गुरफटता नात्यांमधील विश्वास स्नेह कायम ठेवून ज्याला त्याला ज्याचा त्याचा हक्क देणे गरजेचे आहे, मोठ्या भावाचे कर्तव्य मोठ्या भावाने वेळेवर पार पाडले असते तर कदाचित हे हत्याकांड घडले नसते, या या सर्व दुर्दैवी घटनेतून समाजाला एकच शिकवण मिळते की तुमचा हक्क आणि तुमची कर्तव्य योग्य ठिकाणी योग्य वेळी पार पाडणे तुमच्या हिताचेच असते.