📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रतिक्षा संपली! उद्या बारावीचा निकाल, येथे बघा..

मुंबई:  गेल्या अनेक दिवसांपासून असलेली प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल उद्या (मंगळवार, ३ ऑगस्ट) दुपारी लागणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीच माहिती दिली आहे. राज्य बोर्डाचा इयत्ता १०वीचा तर सीबीएसई बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल जाहिर झाला आहे. मात्र, राज्य बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल घोषित होत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली होती. अखेर ती संपुष्टात आली आहे.


https://msbshse.co.in
https://hscresult.11thadmission.org.in
http://hscresult.mkcl.org
http://mahresult.nic.in

 वरील लिंक वर क्लिक करून आपण आपला परीक्षा क्रमांक टाकून निकाल बघू शकाल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने