📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वणव्यामध्ये गारवा देणारा वृक्षच आपला खरा मित्र': समाधान शेवाळे एल.व्ही.एच.विद्यालय मालेगाव कॅम्प येथे युवा दिनानिमित्त व्याख्यान..

मालेगाव: प्रतिनिधी

"वणव्यामध्ये गारवा देणारा वृक्षच आपला खरा मित्र आहे. प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी आपल्याला असलेली आवड व छंद याच्या माध्यमातून सामाजिक भावना जोपासावी असे प्रतिपादन रोटरॅक्ट ऑफ मालेगाव लुम सिटी चे अध्यक्ष समाधान शेवाळे यांनी केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित एल.व्ही. एच. विद्यालय मालेगाव कॅम्प येथे महिला कल्याण व तक्रार निवारण समिती तसेच  विशाखा समिती यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यालयात मुख्याध्यापक श्री. सावंत एस. पी. यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त श्री समाधान शेवाळे यांचे विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे वाचन माणसाला समृध्द बनवते, तसेच अडचणींवर मात करण्यासाठी क्षमता निर्माण होते. असे त्यांनी पुढे सांगितले.

विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख श्री. सूर्यवंशी के.आर.यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला .व्याख्यानाचा व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपला पाठवण्यात आला.व शेवटी अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस पी सावंत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात घडलेले प्रसंग अतिशय छान शब्दात मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यवंशी के.आर. यांनी केले. व आभार श्रीमती. अहिरे बी.एम. यांनी मानले. कार्यक्रमाला महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा. श्रीमती.अहिरे बी.एम, विशाखा समितीच्या अध्यक्षा श्रीमती. खैरनार एस.बी.श्रीमती.पवार एम.बी तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने