स्वमालकीच्या हॉटेल मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विक्री
मालेगाव (मनोहर शेवाळे): शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील रॉयल व स्टार हॉटेल परिसरातून २७०० लीटर बायोडिझेल सदृश्य द्रव्य जप्त करण्यात आले. मागील आठवड्यात महसूल व तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती. या प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचे भाऊ तर राष्ट्रवादीचे मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष यांचे काका जलील शेख यांचेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली आहे.
Former MLA's brother charged in unauthorized biodiesel sale case
केंद्र सरकारने बी १०० बायोडिझेल वापरण्यास परवानगी दिली आहे. यात इतर इंधन टाकून त्याचा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर केला जातो. मात्र, यात चुकीचे तेल तसेच इंधन मिश्रित द्रव्यांची भेसळ करून शहर परिसरात बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने मागील आठवड्यात तहसीलदार चंद्रजित राजपूत व पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली होती. रॉयल हॉटेल भागातून ११०० तर स्टार हॉटेलजवळून लिटर १६०० बायोडिझेल सदृश द्रव ताब्यात घेण्यात येवून जप्त द्रव्य पुरवठा निरीक्षक अशोक सावणे यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले असून याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जलील शेख यांचे सह अन्य एकास अटक करण्यात आली आहे.
Expressing concern over rising crime in Malegaon, former MLA Rashid Sheikh has leveled serious allegations against MLA Maulana Mufti and Superintendent of Rural Police Sachin Patil.
• राजकीय वरदहस्त असल्यानेच अवैध धंद्यांना जोर..
