आघार (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) मालेगाव लाईव्ह नेहमीच कौतुकास्पद कामांची माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवित असते,
एखाद्या चांगल्या कामासाठी आपण पाऊल पुढे टाकले ती त्या कामाची प्रशंसाही आपोआपच होत असते आणि तिचे अनुकरण इतर लोकही करता याच प्रकारे एक अनोखा उपक्रम आघार खुर्द येथे राबविण्यात आला आहे
श्री सिद्धेश्वर मेडिकल आघार खुर्द चे संचालक सुयोग पगार यांनी आपल्या आस्थापनेच्या वर्धापन दिनी, पारंपारिक गोष्टींना फाटा देत वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित केले होते, आणि या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास भरभरून प्रतिसादही मिळाला,
यावेळी सुयोग पगार म्हणाले की, कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर तसेच लोक डाऊन मुळे मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता भासत होती आणि ही गोष्ट कायम मनाला टोचत होती, त्यामुळे आस्थापनेच्या वर्धापन दिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस होता जेणेकरून गरजू लोकांना रक्ताची कमतरता भासणार नाही, तसेच ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांना डोळ्यांच्या तक्रारी असतात त्यानुसार बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती करोना मुळे अडचणीची बनली आहे त्यामुळे बऱ्याचदा नेत्रतपासणी टाळली परंतु याचे गंभीर परिणाम भविष्यात सोसावे लागू नये यासाठी दिया आय केअर युनिट च्या मदतीने गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर ही राबविले...
अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत आहे, तसेच हा पायंडा पुढे इतरांनीही चालू ठेवावा व इतर दुसऱ्या गोष्टीमध्ये खर्च करण्यापेक्षा लोकोपयोगी कामे करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा सुयोग पगार यांनी व्यक्त केली.