नाशिक - मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस
रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी
तलवारीच्या धाकाने दुकानदाराला उचलून नेत, त्याच्याकडील सुमारे ४ लाख रुपयांचे दागिने लुटले. महामार्गावर भररस्त्यावरुन दुचाकीस्वार भामट्यांसह जणांनी सराफ व्यवसायिकाला उचलून स्वराज नगर येथील जंगलात ही लूट केली. संजय साधन बेरा (वय ४३, संत सावता माळी अर्पामटेंट गणेशवाडी पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन दोघा दुचाकीस्वार संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय बोरा हे सराफ व्यावसायिक आहेत. ते बुधवारी दुपारी दीडला त्यांच्या दुकानातून मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडने जात होते. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांची दुचाकी अडवून दुचाकीवरुन बसवून नेत स्वराज्य नगर येथील जंगल झाडीत नेले. तेथे तलवारीच्या मागील बाजूने मारहाण करीत ९० हजाराची रोकड, साडे ३ ग्रॅमचे सोन्याचे मणी, साडे १७ ग्रॅमची सोन्याची चेन, साडे ६ ग्रॅमच्या मंगळसूत्र, साडे ४ सोन्याच्या वाट्या, ओपो मोबाईल असा सुमारे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले.
त्यानंतर त्यांच्याकडून सोन्याच्या दुकानाच्या चाव्या हिसकावून घेत व्यवसायिकाला इतर दोघांनी तेथेच बसवून ठेवले. तर तिसऱ्या संशयिताने व्यवसायिकांकडील चाव्या घेउन दुकानात जाउन दुकान उघडून दुकानातील ११ ग्रमच्या ८० सोन्याच्या मुरण्या, १२ ग्रॅमचे सोन्याचे ओम पान, ६ ग्रॅमचे सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, १२ ग्रॅमचे टॉप्स, १८ ग्रॅमचे सोन्याचे सुट्टे मणी असा सुमारे ७२.५ ग्रॅमचे दागिणे घेउन आले. त्यानंतर संशयितांनी पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारुन टाकण्याची धमकी देत निघून गेले. याप्रकरणी उपनिरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोलिस
जगदाळे तपास करीत आहे.