नागपूर : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. ईडीने कारवाईचा वेग आणखी वाढवला आहे. वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावूनही देशमुख उपस्थित राहीले नाहीत. मात्र, दुसरीकडे देशमुखांशी संबंधित जागांवर छापा टाकण्यात आला आहे. देशमुख यांच्या नागपूर येथील तीन ठिकाणी छापा मारी झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळपासून ही छापेमारी सुरू आहे. ईडीचे चौथे समन्सही देशमुखांनी नाकारले आहे, तसेच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातर्फे दिलासा मिळतो का याबद्दल प्रतीक्षा करत आहेत.
सोमवारी चौथ्यांना नोटीस बजावूनही देशमुख हजर राहीले नाहीत, त्यांनी दोन पानी पत्र लिहीत आपला प्रतिनिधी पाठविणार असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी देशमुख आणि त्यांचे सुपूत्र हृषिकेश देशमुख या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली होती. दोघांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यासाठी सांगितले होते. मात्र, देशमुखांनी आजही चौकशीसाठी सहकार्य केले नाही. नागपूरातील फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याचेही वृत्त आहे.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी, नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर धाड टाकली. चारवेळा चौकशीसाठी बोलावूनही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. अनिल देशमुख गेल्या काही महिन्यांपासून गायब आहेत. त्यांच्या मागावर ईडी आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीही लवकरच अपेक्षित आहे. “देशमुख कुठे आहेत, याबद्दल ईडीलाही माहिती नाही. त्यामुळे सातत्याने जर असहकार्य होत असेल तर देशमुख यांना अटकही केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
source : MahaMTB
Tags
fraud