📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

पुणे (जय योगेश पगारे) आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.  हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून डॉ. बालाजी तांबे कार्यरत होते. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातील आणि अभियांत्रिकीमधील पदवी एकाच वर्षी मिळली होती. तसंच, त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावरही संशोधन केलं होतं.
बालाजी तांबे यांनी योग, आयुर्वेद आणि संगीतोपचार याच्या बाबत महाराष्ट्रासह देशा-परदेशात काम केले आहे. लोणावळा जवळ कार्ले येथे त्यांनी 'आत्मसंतुलन व्हिलेज' ची देखील स्थापना केली आहे. आजही तेथे आयुर्वेद उपचार केले जातात.
दरम्यान सुदृढ नव्या पिढीसाठी बालाजी तांबे यांनी ''गर्भसंस्कार' या पुस्तकाचे लेखन केले त्यानंतर इंग्रजी भाषेतही त्याचे अनुवाद झाले. यासोबत अन्य सहा भाषांमध्येही अनुवाद झाले आहे. सकाळ वृत्तपत्रासोबत बालाजी तांबे काम करत होते. 'फॅमिली डॉक्टर' हे त्यांचे सदर विशेष गाजले. जनसामान्यांना अत्यंत साध्या शब्दात आयुर्वेदाची महती, महत्त्व पटवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने