📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ब्रेकींग..अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द!

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला असून राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. 
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी हायकोर्टाकडून सीईटी रद्द करण्यात आली आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत,असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. 
याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 
 कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
 दरम्यान, राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार होती. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने