📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सोयगाव नागरी आरोग्य केंद्र लसीकरण केंद्रात रेकॉर्डब्रेक लसीकरण

सोयगाव (जय योगेश पगारे) शहरातील नागरी आरोग्य केंद्र सोयगाव येथील लसीकरण केंद्रात covid-19 चे लसीकरण सुरू करण्यात आले होते त्यानुसार 16 जानेवारी 2021 ते 30 जुलै 2021 पर्यंत सुमारे 13768 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आल्याचा विक्रम सोयगाव आरोग्य केंद्राने केला आहे
यामध्ये आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर, तसेच 45 वर्षावरील लाभार्थ्यांना सुरुवातीच्या काळात लसीकरण करण्यात आले त्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना ही लसीकरणाची सुरुवात करण्यात आली त्यानुसार 30 जुलै पर्यंत 13768 जणांमध्ये काहींचे पहिला व काहींचे दुसरा तर काहींचे दोन्ही डोस या केंद्रावर वर देण्यात आले आहेत. अशी माहिती केद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने