📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

खाजगी शाळांच्या फी मध्ये पंधरा टक्‍के सवलत: राज्य शासनाचा निर्णय

भाजपकडून राज्य सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे.
शाळांतील फी कपातीवरून भाजप राज्य सरकारला कोंडीत पकडत आहे, सध्या दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. यानंतर आज राज्य सरकारच्यावतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचे आदेश राज्य सरकारच्या  वतीने देण्यात आले असून त्याचा जीआरही काढण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक सन 2021-22 या वर्षातील 15 टक्के फीमध्ये राज्य सरकारकडून कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात एखाद्या विद्यार्थ्याने फी भरली नाही तर त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नसल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून ज्यां विध्यार्थ्यांनी यावर्षीची फी पूर्णपणे भरली आहे. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या फी मधील 15 टक्के फी पुढील फिमध्ये समाविष्ट करावी किंवा पालकांना ती परत करावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने