📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

तुमचं बँक खाते रिकामं होणार? ; अपडेटच्या नावाखाली मोठा घोटाळा, हे करणं टाळा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था 

कोरोनाच्या काळात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेय. सायबर फसवणुकीच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्य केले जातेय. काही काळापासून ही फसवणूक केवायसी अपडेटच्या नावाखाली सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केलेय.

तर अशा फोन कॉल आणि मेसेजपासून सावध राहा – एका वापरकर्त्याने SBI ला ट्विट करत माहिती दिलीय. मला एक संदेश प्राप्त झाला आहे, त्यात म्हटले आहे की तुमचे SBI खाते स्थगित केले जाईल. अशा परिस्थितीत तुमच्या खात्याचे केवायसी अपडेट करा, यासोबत एक लिंक शेअर केलीय. या ट्विटला उत्तर देताना एसबीआयने म्हटले आहे की, जर अशा कोणत्याही खातेधारकाला असे ईमेल, एसएमएस, फोन कॉल प्राप्त होत असतील आणि कोणतीही लिंक एकत्र शेअर केली जात असेल, तर अशा फोन कॉल आणि मेसेजपासून सावध राहा. बँकेने आपल्या ग्राहकांना असे कॉल किंवा मेसेजमध्ये त्यांचे वैयक्तिक तपशील शेअर करू नये, असे आवाहन केलेय. विशेषतः वापरकर्ता आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन/ सीव्हीव्ही/ओटीपी अजिबात शेअर करू नका.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने