📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मोठा निर्णय ! ‘हिट अँड रन’ झाल्यास मिळणार २ लाख रुपये, नितीन गडकरींची माहिती

नवी दिल्ली :  हिट अँड रन अपघाताती मृत व्यक्तीच्या कुटुंबाला पूर्वी २५ हजारांची मदत मिळायची, मात्र आता ती रक्कम वाढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आता जर हिट अँड रन अपघातात मृत्यू झाला तर २ लाख रुपये मिळावे असा प्रस्थाव ठेवण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन प्रकरणातील अपघातग्रस्तांना भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी या योजनेचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना ५०,००० रुपये भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे.

मंत्रालयाने निवेदनाद्वारे म्हंटले आहे की, हिट अँड रन अपघातग्रस्तांच्या भरपाईसाठी योजना बदलण्याची गरज आहे. आता गंभीर दुखापतीसाठी १२,५०० ते ५०,००० रुपये आणि मृत्यूसाठी २५,००० ते २,००,००० रुपये, अशी योजना असेल. ही योजना १९८९ मध्ये केलेल्या भरपाई योजनेच्या जागी लागू केली जाईल.
२०१९ मध्ये फक्त दिल्लीतच ‘हिट अँड रन’ रस्ते अपघातात ५३६ लोक ठार झाले आणि १,६५५ लोक जखमी झाल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये देशात एकूण ४,४९,००२ रस्ते अपघातांमध्ये १,५१,११३ लोकांचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने